पूंछ, राजौरीत सीमेपलीकडून गोळीबार, तोफगोळे डागले   

एकाचा मृत्यू, तिघे जखमी 

पूंछ : पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती शुक्रवारी देखील सुरू होत्या. त्या अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ व राजौरी जिल्ह्यात गोळीबार केला. त्यात एक ग्रामस्थ ठार झाला असून तीन जखमी झाले आहेत. पहाटे साडेतीन ते पावणेपाच दरम्यान, स्फोटांचे आवाज ऐकू आले. त्यानंतर ब्लॅकआऊट करण्यात आला आणि सायरन वाजवले गेले. याच दरम्यान, शत्रूचे ड्रोन जम्मू भागात हवाई दलाच्या संरक्षण यंत्रणेने नष्ट केले.
 
राजौरी, पूंछ आणि जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला तसेच तोफांचा वापर हल्ल्यासाठी केला. त्याशिवाय काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला जिल्ह्यात रात्रभर गोळीबार सुरू होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याच्या पत्नीसह दोघे जखमी झाले.पूंछच्या लोरन आणि मंधेर क्षेत्रात तोफगोळे डागल्याने ते जखमी झाले. तोफगोळे डागल्याने मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक घरे आणि शेकडो नागरिकांना त्याची झळ बसली. 
 

Related Articles